Home Bibles ☰ Books 1 करिंथकरांस 7:11 · मराठी बायबल
1 करिंथकरांस 7:11 · मराठी बायबल

पण जर ती वेगळे राहते तर तिने लग्न न करताच राहावे किंवा पतीबरोबर समेट करावा. आणि पतीने आपल्या पत्नीला सोडचिठ्ठी देऊ नये.

Cross references

अनुवाद 22:19

त्याला चाळीस औंस चांदीदंड करावा. एका इस्राएल कन्येवर ठपका ठेवून तिची बदनामी केल्याबद्दल ही रक्कम त्याने मुलीच्या वडीलांना द्यावी. त्याने बायको म्हणून तिचा स्वीकार केला पाहिजे. तसेच जन्मभर त्याने तिचा त्याग करता कामा नये.

शास्ते 19:2

एकदा त्या दोघांमध्ये काही तरी वादावादी झाली आणि ती त्याला सोडून बेथलहेमला आपल्या वडीलांकडे परत गेली. तिला जाऊन चार महिने झाले.

यशया 50:1

परमेश्वर म्हणतो, “इस्राएलच्या लोकांनो, मी, तुमची आई यरूशलेमला, घटस्फोट दिला असे तुम्ही म्हणता. पण मी तिला घटस्फोट दिला हे सिध्द करणारे कायदेशीर कागदपत्रे आहेत का? माझ्या मुलांनो, मी कोणाचे पैसे देणे लागतो का? कर्ज फेडण्यासाठी मी तुम्हांला विकले का? नाही. तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांमुळे मी तुम्हाला देऊन टाकले. तुमच्या आईने केलेल्या पापांमुळे मी तिला दूर केले.

यिर्मया 3:1

“एखाद्याने बायकोशी घटस्फोट घेतल्यास ती त्याला सोडते आणि दुसऱ्याशी लग्न करते. मग तो माणूस परत आपल्या बायकोकडे जाऊ शकतो का? नाही. जर तो माणूस त्या बाईकडे परत गेलातर तो देश ‘भ्रष्ट’ होतो. यहूदा, खूप प्रियकर (खोटे देव) असलेल्या वारांगनेप्रमाणे तू वागलीस आणि आता तुला माझ्याकडे परत यायचे आहे.” हा परमेश्वराचा संदेश होता.

मार्क 10:2

काही परुशी येशूकडे आले. त्यांनी त्याला विचारले, “आपल्या पत्नीला घटस्फोट द्यावा हे मनुष्यासाठी कायदेशीर आहे काय?” हे तर त्यांनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी विचारले.

Interlinear

Choose Theme