Home Bibles 1 करिंथकरांस 2:11 · मराठी बायबल
1 करिंथकरांस 2:11 · मराठी बायबल

कारण मनुष्याच्या आत्म्याशिवाय त्या मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा दुसरा कोण मनुष्य आहे? याप्रमाणेच देवाच्या आत्म्याशिवाय देवाचे विचार कोणीच ओळखू शकत नाही.

Cross references

नीतिसूत्रे 14:10

जर एखादा माणूस दु:खी असला तर फक्त त्यालाच ते दु:ख जाणवत असते. त्याचप्रमाणे जर माणूस आनंदी असला तर तो आनंद जाणवू शकेल असा तो एकटाच असतो.

नीतिसूत्रे 20:5

चांगला उपदेश हा खोल विहिरीतून घेतलेल्या पाण्यासारखा असतो. परंतु शहाणा माणूस दुसऱ्याकडून शिकण्याचा आटोकाट प्रयत्न करतो.

नीतिसूत्रे 20:27

मनुष्याचा आत्मा परमेश्वराचा दीप होय. माणसाच्या मनात काय आहे ते परमेश्वराला कळू शकते.

यिर्मया 17:9

“माणसाचे मन फार कपटी असते. त्याच्यावर काही औषध नाही. म्हणूनच कोणालाही मनाचे खरे आकलन होत नाही.

रोमकरांस 11:33

देवाच्या बूद्धीची आणि ज्ञानाची सपत्ती किती अगाध आहे. त्याच्या निर्णय आणि त्याच्या मार्गाचा माग काढणे कठीण आहे.

1 करिंथकरांस 2:10

परंतु देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपणांस प्रकट केले आहे. कारण आत्मा हा प्रत्येक गोष्टीचा शौध घेतो, एवढेच नव्हे तर तो देवाच्या सखोलतेच्या गुप्ततेचाही शोध घेतो.

Interlinear

Choose Theme