Home Bibles 1 करिंथकरांस 12:25 · मराठी बायबल
1 करिंथकरांस 12:25 · मराठी बायबल

यासाठी की शरीरात कोणतेही मतभेद नसावेत तर उलट अवयवांनी एकमेकांची काळजी घ्यावी.

Cross references

योहान 17:21

यासाठी की, त्या सर्वांनी एक व्हावे, पित्या, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसेच त्यांनी आम्हांमध्ये असावे. यासाठी की, तू मला पाठविले असा जगाने विश्वास धरावा.

1 करिंथकरांस 1:10

परंतु बंधूनो, प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावांमध्ये मी तुम्हांस विनंति करतो की, तुम्ही सर्वांनी सारखेच बोलावे आणि तुमच्यात मतभेद असू नयेत, तर तुम्ही एकाच विचाराने व एकाच हेतूने परिपूणे व्हावे.

1 करिंथकरांस 3:3

कारण तुम्ही अजूनसुद्धा दैहिक आहात. कारण तुमच्यात मत्सर व भांडणे चालू आहेत, तर तुम्ही दैहिक नाही काय, व जगातील लोकांसारखे वागत नाही काय?

2 करिंथकरांस 7:12

म्हणून जरी मी तुम्हांला लिहिले तरी ते कोणी चूक केली म्हणून किंवा कोणी दूसऱ्याला दु:ख दिले म्हणून नाही तर उलट देवासमोर तुम्ही आमच्या बाबतीतील तुमची आत्मियता दाखवली हे तुम्हांला पाहता यावे.

2 करिंथकरांस 8:16

जी आस्था माझ्यामध्ये तुमच्याविषयी आहे ती आस्था देवाने तीताच्या अंत:करणात घातली याबद्दल मी देवाचे आभार मानतो,

2 करिंथकरांस 13:11

शेवटी बंधूनो, आपण भेटू या, परिपूर्णतेकडे ध्येय असू द्या. जसे मी तुम्हांला सांगितले तसे करा. एका मनाचे व्हा, शांतीने राहा. आणि प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्याबरोबर असेल.

Interlinear

Choose Theme