कारण जितके वेळा तुम्ही ही भाकर खाता व हा द्राक्षारसाचा प्याला पिता, तितके वेळा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता.
Cross references
मी गेल्यावर तुमच्यासाठी जागा तयार करीन आणि पुन्हा येईन, आणि तुम्हांला माझ्याजवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे.
येशूने उत्तर दिले, “मी परत येईपर्येत त्याने जगावे अशी माझी इच्छा असेल, तर तुला त्याचे काय? तू मला अनुसर.”
आणि ते दोघे प्रेषितांना म्हणाले, “गालीलकरांनो, तुम्ही आकाशाकडे पाहत येथे का उभे राहिलात? हा येशू तुमच्यापासून जसा वर स्वर्गात घेतला गेला व त्याला (येशूला) जाताना तुम्ही पाहिलेत त्याच मार्गाने तो परत येईल.”
म्हणून योग्य समय येईपर्यंत म्हणजे प्रभु येईपर्यंत न्यायनिवाडा करु नका. तो अंधारामध्ये दडलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकील व अंत: करणातील हेतू उघडकीस आणील, त्यावेळी देवाकडून प्रत्येकाची प्रशंसा होईल.
पण प्रत्येक जण त्याच्या क्रमानुसार, ख्रिस्त जो प्रथम फळ आहे, आणि मग ख्रिस्त येण्याच्या वेळी त्याचे असलेले,
कारण, जेव्हा मोठ्याने मुख्य देवदूताच्या आवाजात आणि देवाच्या कर्ण्याच्या आवाजात आज्ञा दिली जाईल, तेव्हा, प्रभु स्वत: स्वर्गातून खाली उतरेल आणि जे ख्रिस्तात मेले होते ते प्रथम उठतील.
त्या दिवशी जेव्हा तो त्याच्या पवित्र लोकांत गौरविला जाण्यासाठी सर्व विश्वासणाऱ्याकडून आश्चर्यचकित केले जाण्यासाठी येईल तेव्हा त्यात तुमचाही समावेश आहे कारण त्याविषयी आम्ही सांगितलेल्या साक्षीवर तुम्ही विश्वास ठेवला.
आम्ही तुम्हांला विनंती करतो की, तुम्ही तुमचे मन पूर्णपणे अस्वस्थ होऊ देऊ नका किंवा सतत विचलित होऊ नका, जर तुम्ही ऐकले की, प्रभूचा दिवस आला आहे, काही लोक अशा प्रकारचे भविष्य वर्तवतील. किंवा काही लोक शिकवणुकीद्वारे किंवा काही लोक आम्हांकडून पत्र लिहिले आहे असे भासवून असा दावा करतील.
तसाच ख्रिस्त पुष्कळ लोकांची पापे नाहीशी करण्याकरिता अर्पपारूपाने केवळ एका वेळेस दिला गेला आणि परत एकदा, दुसऱ्या वेळेस, त्यांची पापे नाहीशी करावी म्हणून नव्हे, परंतु जे त्याची आतुरतेने वाट पाहतात त्यांच्यासाठी दिसेल.
परंतु प्रभूचा दिवस एका चोरासारखा येईल, त्यादिवशी आकाश मोठ्या गर्जनेने नाहीसे होईल व आकाशातील सर्व गोष्टीजळून नाहीशा होतील आणि पृथ्वीवरील लोक व त्यांची कामे उघडकीस येतील.
म्हणून आता, प्रिय मुलांनो, ख्रिस्तामध्ये राहा, यासाठी की, जेव्हा ख्रिस्त प्रकट होइल, तेव्हा आम्हांला दृढविश्वासमिळेल व जेव्हा तो परत येतो तेव्हा त्याच्याद्वारे आम्ही लज्जित केले जाणार नाही.
हनोख, आदामापासूनचा सातवा मनुष्य यानेसुद्धा या लोकांविषयी असेच भाकीत केले आहे: “पाहा हजारो पवित्रदेवदूतांसह प्रभु येत आहे.
पहा, येशू ढगांसह येत आहे! प्रत्येक व्यक्ति त्याला पाहील, ज्यांनी त्याला भोसकले ते सुद्धा त्याला पाहतील. पृथ्वीवरीलसर्व लोक त्याच्यामुळे आक्रोश करतील, होय, असेच होईल! आमेन.
नंतर एक मोठे पांढरे सिंहासन आणि त्याच्यावर जो बसला होता. त्याला मीपाहिले. त्याच्या समोरुन पृथ्वी आणि आकाश ही पळून गेली. आणि त्याच्यासाठी कोठेच जागा नव्हती.
जो येशू या गोष्टीविषयीसाक्ष देतो, तो म्हणतो, “होय, मी लवकर येतो.”आमेन, ये प्रभु येशू, ये!