कारण ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणते, “पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही प्रभूचे आहे.”
Cross references
म्हणून मी आता तुम्हाला सांगतो की तुम्ही माझ्या आज्ञांचे व माझ्या कराराचे पालन करावे; असे तुम्ही कराल तर तुम्ही खास माझे लोक व्हाल हे सर्व जग माझे आहे परंतु त्यातील सर्व लोकांतून मी तुम्हाला निवडून घेईन आणि तुम्ही खास माझे लोक व्हाल.
“सर्वकाही तुमचा देव परमेश्वर ह्याचे आहे. आकाश, आकाशापलीकडचे आकाश, पृथ्वी व पृथ्वीवरचे सर्व काही परमेश्वर देवाचे आहे.
मी (देव) कुणाचाही देणेकरी नाही. या नभोमंडळाखाली जे जे आहे ते सर्व माझे आहे.
पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जग आणि जगातील सर्व लोक परमेश्वराचे आहेत.
मी भुकेला नाही मी जरी भुकेला असतो तरी तुमच्याकडे अन्न मागितले नसते. मी जगाचा मालक आहे आणि जगातील प्रत्येक वस्तू माझ्या मालकीची आहे.
परंतु जर कोणी तुम्हांस सांगितले की, ‘हे मांस यज्ञात देवाला अर्पिलेले होते,’ तर विवेकबुद्धिसाठी किंवा ज्या मनुष्याने सांगितले त्याच्यासाठी खाऊ नका.
या युगातील श्रीमंतास आज्ञा कर की, गर्विष्ठ होऊ नका. पैसा जो चंचल आहे त्यावर त्यांनी आशा ठेवू नये, परंतु देव जो विपुलपणे उपभोगासाठी सर्व पुरवितो त्यावर आशा ठेवावी.