Home Bibles 1 इतिहास 9:3 · मराठी बायबल
1 इतिहास 9:3 · मराठी बायबल

यरुशलेममध्ये राहणाऱ्या यहूदा, बन्यामीन, एफ्राईम आणि मनश्शे घराण्यातील लोक पुढीलप्रमाणे:

Cross references

1 इतिहास 8:28

हे सर्व आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. तशी त्यांची वंशावळींमध्ये नोंद आहे. ते यरुशलेम येथे राहत होते.

2 इतिहास 11:16

इस्राएलच्या सर्व वंशातील जे लोक इस्राएलचा देव परमेश्वर याच्याशी एकनिष्ठ होते ते ही, लेवींनी इस्राएल सोडल्यावर, परमेश्वराला यज्ञार्पणे करण्यासाठी यरुशलेमला आले.

2 इतिहास 30:11

आशेर, मनश्शे आणि जबुलून मधल्या काहींनी मात्र असे न करता विनम्रतेने यरुशलेमला प्रयाण केले.

नहेम्या 11:1

आता इस्राएली लोकांचे नेते यरुशलेम नगरात राहायला आले. बाकीच्या इस्राएलीपैकी कोणी कोणी जायचे ते ठरवायचे होते. म्हणून त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. दर दहाजणापैकी एकाने यरुशलेम या पवित्र नगरात राहावे आणि उरलेल्या नऊ जणांनी आपापल्या गावी वस्ती करावी असे ठरले.

नहेम्या 11:4

यरुशलेममध्ये काही यहुदी आणि बन्यामिनी घराण्यातील व्यक्ती राहात होत्या.)यरुशलेममध्ये आलेले यहुदाचे वंशज पुढीलप्रमाणे: उज्जीयाचा मुलगा अथाया, (उज्जीया जखऱ्याचा मुलगा, जखऱ्या अमऱ्याचा मुलगा आणि अमऱ्या शफाठ्याचा. शफाठ्या महललेलचा. महललेल हा पेरेसचा वंशज)

Interlinear

Choose Theme