“यहूदाचा मुलगा शेला. एर, लादा, कोजेबा योकीम, योवाश आणि साराफ ही शेलाची संतती. एर हा लेखाचा पिता. लादा मारेशाचा आणि बेथ-अश्बेच्या विणकर घराण्यांचा संस्थापक योवाश आणि साराफ यांनी मवाबी बायकांशी लग्ने केली. त्यानंतर ते बेथलहेमला परतले. या घराण्याच्या या नोंदी फार जुन्या आहेत.
Cross references
त्यानंतर तिला शेला नावाचा आणखी एक मुलगा झाला. तिसरा मुलगा झाला तेव्हा यहूदा कजीब येथे राहात होता.
यहूदाचे मुलगे; एर, ओनान, शेला, पेरेस व जेरह; यापैकी एर व ओनान हे कनान देशात मरण पावले; पेरेसाचे मुलगे हेस्रोन व हामूल.
कईला, अकजीब आणि मारेशा ही नऊ नगरे व आसपासची जमीन ही मिळाली.
एर, ओनान व शेला, ही यहूदाची मुले. बथ - शूवा या कनानी स्रीपासून ही त्याला झाली. यहूदाचा पहिला मुलगा एर वाईट प्रवृत्तीचा आहे हे परमेश्वराने जाणले होते त्यामुळे एरला त्याने मारुन टाकले.
यरुशलेममध्ये राहणारे शिलोनी लोक असे: ज्येष्ठ पुत्र असाया आणि त्याचे मुलगे.
बारूखचा मुलगा मासेया (बारुख हा कोल-होजचा मुलगा, कोलहोजे हजायाचा मुलगा, हजाया अदायाचा, अदाया योयारीबचा, योयारीब जखऱ्याचा आणि जखऱ्या शेलहचा मुलगा.)
विणकर फार दु:खी होतील. कारण त्यांना कापड तयार करण्यासाठी आंबाडी लागते. पण नदी कोरडी पडल्यामुळे त्यात आंबाडी होणार नाही.