योशीयाचे मुलगे: थोरला योहानान, दुसरा यहोयाकीम. तिसरा सिद्कीया, चवथा शल्लूम.
Cross references
फारो-नखोने योशीयाचा मुलगा एल्याकीम याला राजा केले एल्याकीम गादीवर आला. एल्याकीमचे नाव फारो-नखोने बदलून यहोयाकीम केले; आणि यहोआहाजला मिसरला नेले. यहोआहाज तेथे मरण पावला.
बाबेलच्या राजाने मत्तन्या याला राजा केले. हा यहोयाखीनचा काका. त्याचे नाव बदलून सिद्कीया असे ठेवले.
यहूदाच्या लोकांनी यरुशलेमचा नवा राजा म्हणून यहोआहाजाची निवड केली. यहोआहाज हा योशीयाचा मुलगा.
राजा नबखद्नेस्सरने वर्षारंभी काही सेवक पाठवून यहोयाखीनला परमेश्वराच्या मंदिरातील बहु मोल खजिन्यासह बाबेलला आणवले.यहोयाखीनच्या नातलगांपैकी सिद् कीया याला नबखद्नेस्सरने येहुदा व येरुशलेमचा राजा केले.
योशीयाचा मुलगा शल्लूम (यहोआहाज) ह्याच्याबद्दल परमेश्वर असे म्हणतो: (राजा योशीया यांच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा शल्लूम यहूदाचा राजा झाला) “यहोआहाज यरुशलेम सोडून दूर गेला आहे. तो पुन्हा यरुशलेममध्ये येणार नाही.
योशीयाचा मुलगा राजा यहोयाकीम ह्यास परमेश्वर असे म्हणतो की “यहोयाकीमसाठी यहूदातील लोक राहणार नाहीत. ‘हे माझ्या बंधू, मला यहोयाकीमबद्दल वाईट वाटते.’ असे ते एकमेकांना म्हणणार नाहीत. यहोयाकीमबद्दल ते शोक करणार नाहीत. “हे स्वामी! हे राजा! मला खूप वाईट वाटते! मला खूप दु:ख होते!’ असे ते म्हणणार नाहीत.
“पण यहूदाचा राजा सिद्कीया हा त्या अतिशय नासल्यामुळे खाण्यालायक न राहिलेल्या अंजिरासारखा असेल. सिद्कीया त्याचे उच्चपदस्थ अधिकारी, यरुशलेममध्ये उरलेले लोक व मिसरमध्ये राहत असलेले यहूदी हे सर्व त्या नासक्या अंजिरासारखे असतील.
यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याच्या कारकिर्दीच्या पाहिल्याच वर्षी परमेश्वराकडून हा संदेश आला. यहोयकीम हा योशीया राजाचा मुलगा होता.
नबुखद्नेस्सर बाबेलचा राजा होता. नबुखद्नेस्सरने, यहोयाकीमचा मुलगा यहोयाकीन उर्फ यकोन्या याच्याऐवजी, सिद्कीयाला यहूदाचा राजा केले. सिद्कीया योशीयाचा मुलगा होता.