Home Bibles 1 इतिहास 29:6 · मराठी बायबल
1 इतिहास 29:6 · मराठी बायबल

तेव्हा, वडीलधारी मंडळी, इस्राएल घराण्यांचे प्रमुख सरदार, अधिकारी, राजसेवेतील कारभारी यासर्वांनी आपापल्या बहुमोल वस्तू देणगीदाखल दिल्या.

Cross references

1 इतिहास 27:1

राजाच्या सैन्यात नोकरीला असलेल्या इस्राएल लोकांची गणना अशी: त्यांचा प्रत्येक गट दर वर्षी एक महिना कामावर असे. राजाकडे चाकरीला असलेल्या लोकांमध्ये वेगवेगळ्या घराण्यांचे प्रमुख, सरदार, अधिकारी, सुरक्षा-अधिपती असे सर्वजण होते. प्रत्येक सैन्यगटात 24,000 माणसे होती.

1 इतिहास 27:25

राजाच्या मालमत्तेची जपणूक करणारे आधिकारी पुढीलप्रमाणे:अदीएलचा मुलगा अज्मावेथ हा राजाच्या भांडारांचा प्रमुख होता. शेतीवाडी, नगरे, गावे आणि किल्ले इथे असलेल्या भांडारांचा प्रमुख योनाथान हा होता. हा उज्जीयाचा मुलगा.

1 इतिहास 28:1

राजाने इस्राएल लोकांमधील सर्व पुढाऱ्यांना एकत्र बोलावले. त्यांना त्याने यरुशलेमला येण्यास सांगितले. घराण्यांचे प्रमुख, राजाचे सेनापती, अधिकारी, अंमलदार, कोठारांची गुरांची, राजपुत्रांची जबाबदारी उचलणारे राजाचे सर्व महत्वाचे अधिकारी, शूर वीर आणि लढवय्ये या सर्वांना त्याने बोलावले.

2 इतिहास 35:8

या उत्सवा निमित्त योशीयाच्या सरदारांनीदेखील लोकांना, लेवींना आणि याजकांना पशूंचे आणि वस्तूंचे मुक्त वाटप केले. मुख्य याजक हिल्कीया, जखऱ्या आणि यहीएल हे मंदिराचे प्रमुख कारभारी होते. त्यांनी 2,600 शेरडे मेंढरे आणि 300 बैल एवढे पशू वल्हांडणाचे बळी म्हणून याजकांना दिले.

यशया 60:3

राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे (देवाकडे) येतील. राजे तुझ्या तेजस्वी प्रकाशाकडे येतील.

2 करिंथकरांस 9:7

प्रत्येक माणसाने अंत:करणात ठरविल्याप्रमाणे द्यावे, खेदाने किंवा बळजबरीने देणे भाग पडते म्हणून देऊ नये. कारण आनंदाने देणाऱ्यावर देव प्रेम करतो.

Interlinear

Choose Theme