Home Bibles 1 इतिहास 29:30 · मराठी बायबल
1 इतिहास 29:30 · मराठी बायबल

इस्राएलचा राजा म्हणून त्याने जे जे केले ते सर्व या लेखनात आलेले आहे. त्याचे पराक्रम आणि त्याची कारकीर्द, इस्राएल आणि अवतीभवतीचे सर्व देश यांच्यावर या काळात गुदरलेले प्रसंग याची हकीकत या ग्रंथांमध्ये आहे.

Cross references

2 राजे 10:34

“इस्राएलच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात येहूच्या इतर पराक्रमांची नोंद आहे.

2 राजे 14:28

“इस्राएलच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात यराबामच्या पराक्रमांची नोंद आहे. दिमिष्क आणि हमाथ त्याने इस्राएलच्या भूमीला पुन्हा जोडले याचीही नोंद त्यात आहे. (ही नगरे यहूदाच्या ताब्यात होती)

दानीएल 2:21

तो काळ आणि ऋ तू बदलतो. आणि राजेही बदलतो. तोच राजांना सत्ता देतो. आणि तोच त्यांची सत्ता काढून घेतो. लोकांनी शहाणे व्हावे म्हणून तो त्यांना शहाणपण देतो, त्यांनी ज्ञानी व्हावे म्हणून तो त्यांना सर्व गोष्टी शिकू देतो.

दानीएल 4:23

राजा तू पवित्र देवदूताला स्वर्गातून खाली येताना पाहिलेस.तो देवदूत म्हणाला, वृक्ष तोडून टाका. क्ष्याचा नाश करा.पण खोड व मुळे राहू द्या. त्याभोवती लोखंड व कासे यांची जाळी बसवा त्याला गवतात राहू द्या तो दवात भिजेल. तो वन्य पशूंप्रमाणे राहील. सात पावसाळे (सात वर्ष) असे काढावे लागतील.

दानीएल 4:25

नबुखद्नेस्सर राजा तुला सक्तीने लोकांपासून दूर जावे लागेल. तू वन्य पशूंमध्ये राहाशील, गुरांप्रमाणे तुला गवत खावे लागले.तू दवात भिजशील, सात पावसाव्व्यानंतर (सात वर्षानंतर) तू धडा शिकशील. परात्पर देवाचेच माणसांच्या राज्यावर प्रभुत्व असते हे तुला कळेल. देव त्याला पाहिजे त्यांच्याच हातात राज्ये सोपवितो.

Interlinear

Choose Theme