Home Bibles 1 इतिहास 27:29 · मराठी बायबल
1 इतिहास 27:29 · मराठी बायबल

शारोनचा शिमय हा शारोन भोवतालच्या गाईगुरांचा मुख्य होता. अदलयचा मुलगा शाफाट हा दऱ्याखोऱ्यातील गुरांवरचा मुख्य होता.

Cross references

अनुवाद 1:7

आता तुम्ही इथून अमोऱ्यांच्या डोंगराळ प्रदेशात जा. आसपासच्या सर्व प्रदेशात प्रवास करा. यार्देनेच्या खोऱ्यात, अराबांच्या पहाडी प्रदेशात, पश्चिमेकडील उतारावर, नेगेवमध्ये समुद्रकिनारी जा. कनान आणि लबानोन मार्गे फरात या महानदीपर्यंत जा.

1 इतिहास 5:16

गाद घराण्यातील लोक गिलाद प्रांतात राहत होते. बाशान, बाशानच्या आसपासची खेडी, शारोनच्या आसपासची शिवारे एवढ्या भागात थेट सीमेपर्यंत राहत होते.

2 इतिहास 26:10

वाळवंटातही त्याने बुरुज बांधले. अनेक विहिरी खणल्या. डोंगराळ भागात आणि सपाटीवर त्याची बरीच गुरेढोरे होती. तसेच तेथील सुपीक भागात शेतकरी होते. द्राक्षबागांच्या निगराणीसाठी देखील त्याची माणसे होती. उज्जीयाला शेतीची आवड होती.

उपदेशक 2:7

मी पुरुष आणि स्त्री गुलामांना विकत घेतले, आणि माझ्या घरातही गुलामांचा जन्म झाला. माझ्याजवळ खूप मोठया गोष्टी होत्या. माझ्याजवळ जनावरांची खिल्लारे आणि मेंढ्यांचे ढकळप होते. यरुशलेममधील कोणाही माणसाजवळ नसतील इतक्या गोष्टी माझ्याजवळ होत्या.

यशया 35:2

वाळवंट फुलणाऱ्या फुलांनी भरून जाईल आणि आपला आनंद दाखवेल. त्या वेळी वाळवंट जणू आनंदाने नाचत असल्याचे भासेल. लेबानोनचे बन, कर्मेलची टेकडी व शारोनची दरी ह्यांच्याप्रमाणे ते सुंदर होईल. सर्व लोकांनी परमेश्वराचे गौरव पाहिल्यामुळे हे सर्व घडेल. लोक आमच्या देवाचे लावण्य पाहतील.

यशया 65:10

मग शारोन दरी मेंढ्यांचे चरण्याचे कुरण होईल. अखोरची दरी गुरांचे विसाव्याचे ठिकाण होईल. ह्या सर्व गोष्टी, माझ्या लोकांसाठी मला शोधणाऱ्या लोकांसाठी होतील.

Interlinear

Choose Theme