Home Bibles 1 इतिहास 26:27 · मराठी बायबल
1 इतिहास 26:27 · मराठी बायबल

यापैकी काही युध्दात मिळालेली लूट होती. ती त्यांनी परमेश्वराच्या मंदिराच्या कामासाठी देऊन टाकली.

Cross references

यहोशवा 6:19

सोन्याचांदीच्या तसेच तांब्या-लोखंडाच्या सर्व वस्तू परमेश्वराच्या आहेत. त्या परमेश्वराच्या भांडारात जमा केल्या पहिजेत.”

2 शमुवेल 8:11

दावीदाने त्या स्वीकारुन परमेश्वराला अर्पण केल्या. या आधीच्या समार्पित वस्तंूबरोबरच त्या ठेवून दिल्या. आपण पराभूत केलेल्या राष्ट्रामधून दावीदाने लूट आणलेली होती.

1 इतिहास 18:11

राजा दावीदाने त्या वस्तू शुध्दीकरण करुन परमेश्वराला अर्पण केल्या. अदोम, मवाब, अम्मोनी, पलिष्टी आणि अमालेकी लोकांकडून आलेल्या वस्तूही त्याने अशाच परमेश्वराला वाहिल्या.

2 इतिहास 5:1

मग शलमोनाने काढलेले परमेश्वराच्या मंदिराचे सर्व काम समाप्त झाले. आपले वडील दावीद यांनी मंदिरासाठी दिलेल्या सर्व वस्तू त्याने मग आत आणल्या. सोन्या - रुप्याच्या सर्व वस्तू आणि इतर सामानसुमान त्याने आणले. मंदिराच्या कोषागारात त्याने या सर्व वस्तू ठेवल्या.

नहेम्या 10:32

“मंदिराच्या सेवेच्या सर्व आज्ञा पाळायची जबाबदारी आम्ही घेत आहोत. देवाच्या मंदिराची काळजी घेण्यासाठी म्हणून एकतृतीयांश शेकेल आम्ही दरवर्षी देऊ.

Interlinear

Choose Theme