Home Bibles 1 इतिहास 24:4 · मराठी बायबल
1 इतिहास 24:4 · मराठी बायबल

इथामारपेक्षा एलाजारच्या घराण्यात वडीलधारी प्रमुख मंडळी अधिक निघाली. एलाजारच्या घराण्यात सोळा जण प्रमुख होते तर इथामारच्या घराण्यात आठ जण.

Cross references

गणना 25:11

“माझ्या लोकांविषयी माझ्या भावना तीव्र आहेत. ते फक्त माझेच असावेत असे मला वाटते. एलाजारच्या मुलांने याजक अहरोनच्या नातवाने इस्राएल लोकांना माझ्या रागापासून वाचवले. माझ्या लोकांबद्दलच्या त्या भावना दाखवून त्याने हे केले म्हणून मला आधी वाटत होते त्याप्रमाणे मी आता त्या लोकांना मारणार नाही.

1 इतिहास 15:6

मरारीच्या कुळातले. 220 जण होते. असाया हा त्यांचा नेता होता.

1 इतिहास 23:24

हे झाले लेवीचे वंशज आपापल्या घराण्यांप्रमाणे त्यांची शिरगणती झाली. ते घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या नावाची नोंद झालेली आहे. जे वीस किंवा त्याहून अधिक वयाचे होते त्यांनी परमेवराच्या मंदिरात सेवा करणे हे त्यांचे काम.

2 इतिहास 1:2

शलमोन सर्व इस्राएल लोकांशी म्हणजेच, सरदार, अधिकारी, न्यायाधीश, इस्राएलमधील प्रमुख मंडळी या सर्वांशी बोलला.

नहेम्या 12:12

योयाकीमच्या काळात याजकांच्या घराण्यांचे मुख्य असलेले लोक पुढील प्रमाणे:सरायाच्या घराण्याचा प्रमुख मराया. यिर्मयाच्या घराण्याचा प्रमुख हनन्या

Interlinear

Choose Theme