Home Bibles 1 इतिहास 22:13 · मराठी बायबल
1 इतिहास 22:13 · मराठी बायबल

इस्राएलसाठी परमेश्वराने मोशेला जे नियमशास्त्र सांगितले ते तू कसोशीने पाळ म्हणजे तू यशस्वी होशील. घाबरु नको. दृढ राहा. हिंमत बाळग.

Cross references

अनुवाद 31:6

शौर्य दाखवा. खंबीर पणाने वागा. त्या लोकांची भीती बाळगू नका! कारण प्रत्यक्ष तुमचा देव परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. तो तुम्हाला अंतर देणार नाही, तुमची साथ सोडणार नाही”

अनुवाद 31:7

मग मोशेने यहोशवाला बोलावले. सर्वांसमक्ष त्याला सांगितले, “खंबीर राहा आणि शौर्य गाजव. या लोकांच्या पूर्वजांना परमेश्वराने जी भूमी द्यायचे कबूल केले आहे, तेथे तू त्यांना नेणार आहेस. ती काबीज करायला या इस्राएलांना तू मदत कर.

अनुवाद 31:8

परमेश्वर तुमच्या सोबतीला तुमच्यापुढेच चालणार आहे. तो तुम्हाला सोडून जाणार नाही, तुम्हाला अंतर देणार नाही. तेव्हा खचून जाऊ नका आणि निर्भय व्हा.”

यहोशवा 1:6

“यहोशवा, तू खंबीर हो, हिंमत धर. या लोकांचे नेतृत्व कर म्हणजे ते तो देश घेऊ शकतील. हा देश त्यांना द्यायचे मी त्यांच्या पूर्वजांना कबूल केले आहे.

यहोशवा 1:18

म्हणजे एखाद्याने तुझी आज्ञा पाळायला नकार दिला किंवा तुझ्याविरूध्द बंड केले तर तो मारला जाईल. तू मात्र बलवान व खंबीर राहा.”

1 राजे 2:2

“आता मी जाणार. मरण सगळ्यांनाच अटळ आहे. तूही आता चांगला खंबीर, जबाबदार पुरुष झाला आहेस.

1 राजे 2:3

आता परमेश्वर देवाच्या सर्व आज्ञांचे काळजीपूर्वक पालन कर. मोशेच्या नियमशास्त्रात लिहिलेल्या परमेश्वराच्या सर्व आज्ञा, नियम व निर्णय काटेकोरपणे पाळ. त्यामुळे तू जिथे जाशील तिथे, व जे कार्य हातात घेशील त्यात यशस्वी होशील.

1 इतिहास 28:7

माझ्या आज्ञा आणि नियम यांचे पालन करायला शलमोनाने सुरवात केली आहे. त्याने कसोशीने हे आज्ञापालन असेच पुढे चालू ठेवले तर त्याच्या राज्याला मी सर्वकाळ स्थैर्य देईन.”

1 इतिहास 28:10

शलमोन, परमेश्वराने त्याचे पवित्र स्थान म्हणजे मंदिर बांधून घेण्यासाठी तुझी निवड केली आहे हे चांगले लक्षात ठेव. हिंमत बाळग आणि हे कार्य पूर्णत्वाला ने.”

1 इतिहास 28:20

दावीद शलमोनाला पुढे म्हणाला, “धीर धर आणि न भिता या कामाची सांगता कर. प्रत्यक्ष परमेश्वर, माझा देव तुझ्या सोबत आहे, तेव्हा घाबरु नको. सर्व काम पुरे़ होईपर्यंत तो तुला साथ देईल. ही साथ तो अर्धवट सोडणार नाही. मंदिराचे बांधकाम तू पूर्णत्वाला नेशील.

2 इतिहास 14:6

या काळात आसाने यहूदात भक्कम तटबंदीची नगरे बांधली. परमेश्वराने शांतता दिल्यामुळे या काळात आसा युध्दमुक्त राहिला.

2 इतिहास 20:20

यहोशाफाटचे सैन्य भल्यासकाळी तकोवाच्या वाळवंटात गेले. ते निघत असताना यहोशाफाट समोर उभा राहून त्यांना म्हणाला, “यहूदा आणि यरुशलेम नगरांमधील लोकहो, ऐका. आपल्या परमेश्वर देवावर श्रध्दा ठेवा आणि खंबीरपणे उभे राहा. परमेश्वराच्या संदेष्ट्यांवर विश्वास ठेवा. जय तुमचाच आहे.”

2 इतिहास 26:5

जखऱ्याच्या हयातीत त्याने देवाचे अनुसरण केले. आदरपूर्वक परमेश्वराला मानणे त्याला जखऱ्याने शिकवले. तो असे वागत असे तोपर्यंत परमेश्वर देवाने त्याचे कल्याण केले.

स्तोत्रसंहिता 1:3

त्यामुळे तो माणूस ओढ्याच्या कडेला लावलेल्या झाडासारखा शक्तिशाली होऊ शकतो तो योग्यवेळी फळे येणाऱ्या झाडासारखा असतो तो पाने असलेल्या व न मरणाऱ्या झाडासारखा असतो तो जे काही करतो ते यशस्वी होते.

स्तोत्रसंहिता 119:6

तर मी जेव्हा तुझ्या आज्ञांचा अभ्यास करीन तेव्हा मला कधीही लाज वाटणार नाही.

यिर्मया 22:3

परमेश्वर म्हणतो, “फक्त योग्य व न्याय्य गोष्टीच करा. लुटल्या जात असलेल्या लोकांचे लुटारुपासून रक्षण करा. अनाथ मुलाशी अथवा विधवांशी वाईट वागू नका अथवा त्यांना दुखवू नका. निरपराध्यांना मारु नका.

मत्तय 3:15

येशूने त्याला उत्तर दिले, “आता असेच होऊ दे. देवाची इच्छा हीच आहे म्हणून आपण असेच केले पाहिजे.” तेव्हा योहान येशूचा बाप्तिस्मा करण्यास तयार झाला.

प्रेषितांचीं कृत्यें 13:22

नंतर देवाने शौलाला काढून टाकले. देवाने दावीदाला त्यांचा राजा केले. दावीदाविषयी देव असे बोलला: दावीद, इशायाचा पुत्र, हा मला आवडला, मला ज्या गोष्टी पाहिजेत त्या सर्व तो करील.

1 करिंथकरांस 16:13

सावध असा, तुमच्या विश्वासात बळकट राहा.

गलतीकरांस 6:2

एकमेकांची ओझी वाहा.अशा रितीने तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल.

इफिसकरांस 6:10

शेवटी, प्रभूमध्ये तुम्ही त्याच्या महान शक्तीसामर्थ्याने सशक्त व्हा.

2 तीमथ्थाला 2:1

माझ्या मुला तू ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या कृपेत बलवान हो.

याकोब 2:8

जर तुम्ही पवित्र शास्त्रातील महान आज्ञा “आपल्या शेजाऱ्ावर आपल्यासारखीच प्रीति करा” पाळता तर तुम्ही योग्य करता.

Interlinear

Choose Theme