अरण्यातील वृक्ष परमेश्वरासमोर हर्षभरित होऊन गातील कारण साक्षात परमेश्वरच जगाला न्याय देण्यासाठी आलेला असेल.
Cross references
तू नक्की नगराचा नाश करणार नाहीस; दुष्ट लोकांना मारण्यासाठी तू पन्नास नीतिमान लोकंना मारणार नाहीस; आणि जर तसे झाले तर मग चांगले व वाईट अशा लोकांची गत सारखीच होणार; त्या दोन्ही प्रकारच्या लोकांना शिक्षा होणार; तू सर्व पृथ्वीचा न्यायाधीश आहेस, तू योग्य तेच करशील हे मला माहीत आहे.”
खूप लोक सापळ्यात अडकले आणि दुखी झाले कारण त्यांच्या पुढे असंख्य संकटे होती. संकटांच्या ओझ्याखाली ते लोक चेंगरले गेले आहेत. परमेश्वरा, त्यांना आश्रयदेणारी एक चांगली जागा तू बन.
शेते आणि त्यात उगवणारे सर्व सुखी व्हा. जंगलातल्या वृक्षांनो गा आणि सुखी व्हा.
नद्यांनो, टाळ्या वाजवा पर्वतांनो, सगळ्यांनी बरोबर गाणे गा. [10] परमेश्वरासमोर गा. कारण तो जगावर राज्य करायला येत आहे. तो जगावर न्यायाने राज्य करेल, तो लोकांवर चांगुलपणाने राज्य करेल.
परमेश्वराने महान गोष्टी केल्या म्हणून आकाश आनंदात आहे खोलवरची भूमीसुध्दा सुखात आहे. डोंगर गाण्यातून देवाचे आभार मानीत आहेत. रानातील सर्व वृक्ष आनंदात आहेत. का? कारण परमेश्वराने याकोबला वाचविले. परमेश्वराने इस्राएलसाठी फार मोठ्या गोष्टी केल्या.
परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला,“उंच गंधसरुची एक फांदी मी तोडून घेईन. शेड्याची डहाळी मी घेईन आणि मी स्वत: उंच पर्वतावर ती लावीन.
आणि ज्यांना देव माहीत नाही आणि आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी आवश्यक त्या आज्ञा पाळीत नाहीत त्यांना देव शिक्षा करील.
त्या दिवशी जेव्हा तो त्याच्या पवित्र लोकांत गौरविला जाण्यासाठी सर्व विश्वासणाऱ्याकडून आश्चर्यचकित केले जाण्यासाठी येईल तेव्हा त्यात तुमचाही समावेश आहे कारण त्याविषयी आम्ही सांगितलेल्या साक्षीवर तुम्ही विश्वास ठेवला.
म्हणून प्रिय मित्रांनो, ज्याअर्थी तुम्ही यागोष्टींची वाट पाहत आहात, त्याअर्थी आपणास प्रभूसमोर डागरहीत, दोषरहित व शांतता टिकविण्यांचा आटोकाट प्रयत्न करा.
ते म्हणाले:“आम्ही तुझे आभार मानतो. सर्वसमर्थ प्रभु देवा, तूच एक आहेस की जो तू आहेस व होतास. आम्ही तुझे उपकार मानतोकारण तुझे महान सामर्थ्य वापरुन सत्ता चालविण्यास सुरुवात केलीस