मग त्याने एकूनएक इस्राएल स्त्री-पुरुषांना एकएक भाकर, खजूर आणि किसमिस एवढे दिले.
Cross references
शलमोन जागा झाला. परमेश्वर स्वप्नात येऊन आपल्याशी बोलला हे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर शलमोन यरुशलेमला जाऊन परमेश्वराच्या करारकोशापुढे उभा राहिला. शलमोनाने परमेश्वरासाठी होमार्पण केले. त्यात त्याने परमेश्वराला शांतीअर्पणे वाहिली. मग आपल्या राज्यकारभारात ज्यांची मदत झाली त्या सर्व वडिलधाऱ्यांना आणि सेवकांना मेजवानी दिली.
हिज्कियाने 1000 बैल आणि 7000 मेंढरे व पुढाऱ्यांनी 1000 बैल व 10000 मेंढरे मारुन खाण्यासाठी या समुदायाला दिली. त्यासाठी बऱ्याच याजकांना शुचिर्भूत व्हावे लागले.
वल्हांडणासाठी योशीयाने 30,000 शेरडे मेंढरे यज्ञपशू म्हणून इस्राएल लोकांना दिली. या खेरीज 3000 बैल दिले. हे पशुधन त्याच्या खाजगी मालमत्तेतील होते.
नहेम्या म्हणाला, “आता जा आणि सुग्रास अन्न खा, गोड पेये प्या. ज्यांना असे खाणेपिणे करता आलेले नाही त्यांना आपल्यातले काही खाद्य-पेय पाठवा. परमेश्वराचा हा पवित्र दिवस आहे. दु:खी राहू नका. कारण परमेश्वराचा आनंदच तुम्हाला सामर्थ्य देणार आहे.”
पण विशेष पवित्र दिवसांसाठी राजाने आवश्यक त्या गोष्टी दिल्या पाहिजेत. सण, अमावस्या, शब्बाथ ह्या दिवसांसाठी आणि इस्राएलच्या खास सणांसाठी राजाने होमार्पणे, धान्यार्पणे व पेयार्पणे ह्यांची सोय केली पाहिजे. इस्राएलच्या शुद्धतेसाठी असलेली पापार्पणे, धान्यार्पणे, होमार्पणे व शांत्यर्पणेसुद्धा राजाने दिली पाहिजेत.”
कुरकुर न करता एकमेकांचा पाहूणचार करा.