Home Bibles 1 इतिहास 16:11 · मराठी बायबल
1 इतिहास 16:11 · मराठी बायबल

परमेश्वराकडे पाहा त्याचे सामर्थ्य बघा. मदतीसाठी त्याला शरण जा.

Cross references

2 इतिहास 6:41

“आता, हे परमेश्वर देवा, तुझे सामर्थ मिरवणाऱ्या या करारकोशाजवळ, आपल्या विश्रामस्थानी ये. तुझे याजक उध्दाराने भूषित होवोत. तुझे भक्त या सुजनतेने सुखी होवोत.

स्तोत्रसंहिता 4:6

बरेच लोक म्हणतात “आम्हाला देवाचा चांगुलपणा कोण दाखवेल? परमेश्वरा, आम्हाला तुझे तेजस्वी मुख पाहू दे.”

स्तोत्रसंहिता 24:6

ते चांगले लोक देवाचा मार्ग अवलंबतात. ते याकोबाच्या देवाकडे मदतीसाठी जातात.

स्तोत्रसंहिता 27:8

परमेश्वरा मला तुझ्याशी बोलायचे आहे. मला अगदी माझ्या ह्दयातून तुझ्याशी बोलायचे आहे. परमेश्वरा, मी तुझ्यासमोर तुझ्याशी बोलायला आलो आहे.

स्तोत्रसंहिता 67:1

देवा, मला दया दाखव आणि आशीर्वाद दे. कृपाकरुन आमच्या स्वीकार कर!

स्तोत्रसंहिता 68:35

देव त्याच्या मंदिरात भीतिदायक दिसतो. इस्राएलचा देव त्याच्या लोकांना शक्ती आणि सामर्थ्य देतो. देवाचे गुणगान करा.

स्तोत्रसंहिता 78:61

देवाने इतर देशांना त्याच्या माणसांना पकडू दिले. शत्रूनी देवाचे “सुंदर रत्न” घेतले.

स्तोत्रसंहिता 84:6

ते बाका दरीतून जातात तेव्हा देव तिला झऱ्याचे शिशिरातल्या पावसाने निर्माण केलेल्या जलाशयांचे स्वरुप देतो.

आमोस 5:6

परमेश्वराकडे जा आणि जगा. तुम्ही परमेश्वराकडे गेला नाहीत, तर योसेफच्या घराला आग लागेल. ती आग योसेफचे घर भस्मसात करील. बेथेलमधील ही आग कोणीही विझवू शकणार नाही.

सफन्या 2:2

मलूल होऊन सुकून जाणाऱ्या फुलाप्रमाणे तुमचे जीवन होण्याआधीचे तुमचे आचार बदला. दिवसाच्या उष्णतेने, फूल कोमेजून वाळून जाते. परमेश्वराने आपला क्रोध प्रकट करताच, तुमचीही स्थिती तशीच होईल. म्हणून परमेश्वराचा क्रोधाचा दिवस तुमच्यावर येण्यापूर्वीच तुमचे आचरण बदला.

Interlinear

Choose Theme