Home Bibles 1 इतिहास 15:29 · मराठी बायबल
1 इतिहास 15:29 · मराठी बायबल

करार कोश दावीदनगरात पोहंचला तेव्हा शौलची मुलगी मीखल हिने खिडकीतून पाहिले. दावीद राजाला नाचताना, जल्लोष करताना पाहून त्याच्याबद्दलचा तिचा आदर नाहीसा झाला. तिला त्याचा तो वेडगळपणा वाटला.

Cross references

निर्गम 15:20

त्यानंतर अहरोनाची बहीण मिर्याम संदेष्टी हिने डफ घेतला आणि ती व इतर स्त्रिया गाऊ व नाचू लागल्या. मिर्याम हे गीत पुन्हा पुन्हा गात होती;

गणना 10:33

मग होबाब मान्य झाला. आणि परमेश्वराच्या पर्वतापासून ते प्रवास करीत निघाले. याजकांनी परमेश्वराचा पवित्र कराराचा कोश घेतला व ते लोकांच्यापुढे चालले. मुक्कामासाठी जागा शोधताना तीन दिवस तो पवित्र कोश त्यांनी वाहिला.

अनुवाद 31:26

“हा नियमशास्त्राचा ग्रंथ घ्या आणि परमेश्वराच्या कराराच्या कोशात ठेवा. तुमच्याविरुद्ध हा साक्ष राहील.

यहोशवा 4:7

परमेश्वराच्या कराराचा पवित्र कोश वाहून नेत असताना नदी दुभंगली व परमेश्वराने यार्देनेचा प्रवाह रोखला ही गोष्ट इस्राएलांच्या कायम स्मरणात राहावी म्हणून हे दगड आहेत असे त्यांना सांगा.”

शास्ते 20:27

पुन्हा सर्व इस्राएल लोक बेथेल येथे आले. तेथे बसून त्यांनी रडकुंडूला येऊन परमेश्वरापुढे गाऱ्हाणे मांडले. दिवसभर त्यांच्यापैकी कोणीही अन्र घेतले नाही. परमेश्वाला यज्ञार्पणे आणि शांति अर्पणे वाहिली.

1 शमुवेल 4:3

इस्राएली सैनिक आपल्या तळावर परतले तेव्हा वडीलधाऱ्यांनी त्यांना विचारले, “परमेश्वराने का बरे पलिष्ट्यांमार्फत आपला पराभव करवला? आपण शिलोहून परमेश्वराच्या कराराचा कोश येथे आणू या. म्हणजे या लढाईत परमेश्वर आपल्याबरोबर राहील आणि शत्रू पासून आपले संरक्षण करील.”

1 शमुवेल 18:27

तो काही लोकांना बरोबर घेऊन पलिष्ट्यांवर चालून गेला. त्याने दोनशेपलिष्ट्यांना मारले. त्यांच्या अग्रत्वचा काढून दावीदाने त्या शौलला दिल्या. कारण राजाचा जावई व्हायचे त्याच्या मनात होते.

1 शमुवेल 19:11

शौलाने काही जणांना दावीदाच्या घरी पाठवले. त्यांनी त्याच्या घरावर पहारा दिला. रात्रभर ते बसून राहिले. सकाळी त्याला मारावे असा त्यांचा बेत होता. पण दावीदाच्या बायकोने, मीखलने. दावीदाला सावध केले. तिने त्याला रातोरात पळून जाऊन जीव वाचवायला सांगितले, नाही तर उद्या तुझा खून होईल असे ती त्याला म्हणाली.

1 शमुवेल 25:44

शौलची मुलगी मीखल हिच्याशीही त्याचे लग्न्न झाले होते, पण शौलने आपल्या मुलीला माहेरी आणून तिचे पालती याच्याशी लग्न्न लावले. हा पालती गल्लीम येथील असून लइश याचा मुलगा होता.

2 शमुवेल 3:13

यावर दावीद म्हणाला, “हे छान झाले, मी करार करायला तयार आहे. आता माझे एक मागणे आहे. शौलची मुलगी मीखल हिला आपल्याबरोबर आणलेस तरच मी तुला भेटीन.”

2 शमुवेल 6:16

शौलाची मुलगी मीखल हे सर्व खिडकीतून पाहात होती. कोश नगरात आणत असताना दावीद त्यापुढे नाचत. उड्या मारत होता. मीखलने हे पाहिले तेव्हा तिला खेद वाटला. दावीद स्वत:चे हसे करुन घेत आहे असे तिला वाटले.

2 शमुवेल 6:20

दावीद मग घरातील सर्वांना आशीर्वाद द्यायला घरात आला. तेव्हा शौलकन्या मीखल हिने त्याला गाठले आणि ती म्हणाली, “इस्राएलाच्या राजाने आज आपला मान राखला नाही. नोकरा चाकरांमोर, दासी समोर त्या मूर्खांपैकीच एक असल्याप्रमाणे तुम्ही आपले कपडे काढलेत.“

1 इतिहास 17:1

दावीद आपल्या घरी राहायला गेल्यावर एकदा नाथान या संदेष्ट्यास म्हणाला, “मी गंधसरुच्या लाकडाच्या घरात राहत असलो तरी परमेश्वराचा करारकोश मात्र अजूनही एका तंबूतच आहे. देवासाठी मंदिर बांधावे असा माझा विचार आहे.”

स्तोत्रसंहिता 30:11

मी तुझी प्रार्थना केली आणि तू मला मदत केलीस. तू माझे रडणे नाचण्यात बदलवलेस. तू माझे दुखाचे कपडे काढून टाकलेस आणि मला सुखात गुडाळलेस.

स्तोत्रसंहिता 69:7

माझा चेहरा लाजेने झाकला गेला आहे. मी तुझ्यासाठी ही लाज जवळ बाळगतो.

स्तोत्रसंहिता 149:3

त्या लोकांना डफाच्या आणि वीणेच्या तालावर नाच करुन देवाची स्तुती करु द्या.

स्तोत्रसंहिता 150:4

डफ वाजवून आणि नाचून देवाची स्तुती करा. तंतुवाद्यावर आणि बासरीवर त्याचे गुणगान करा.

उपदेशक 3:4

रडण्याची आणि हसण्याचीही वेळ असते. दु:खी होण्याची आणि आनंदाने नाचायचीही वेळ असते.

यिर्मया 3:16

त्या काळात, देशात तुमच्यापैकी बरेचजण असतील.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश होता.“त्या वेळेला, लोक पुन्हा कधीही असे म्हणणार नाहीत, ‘परमेश्वराच्या कराराचा कोश आमच्याजवळ असण्याचे दिवस आम्हाला आठवतात.’ येथून पुढे ते त्या पवित्र कोशाचा विचारसुद्धा करणार नाहीत.

यिर्मया 30:19

“तेथील लोक स्तुतिस्तोत्रे गातील. तेथे हास्याच्या लहरी उठतील. त्यांना मी पुष्कळ संतती देईन इस्राएल व यहूदा यांचा आकार लहान राहणार नाही मी त्यांना मान मिळवून देईन. कोणीही त्यांना खाली पाहणार नाही.

यिर्मया 33:11

तेथे सुखाचे व आनंदाचे कल्लोळ उठतील. नव-वर-वधूंचे सुखसंवाद ऐकू येतील. परमेश्वराला अर्पण करण्यासाठी भेटी घेऊन परमेश्वराच्या मंदिरात येणाऱ्या लोकांचे आवाज ऐकू येतील. ते लोक म्हणतील, ‘परमेश्वर देवाची स्तुती करा. परमेश्वर चांगला आहे. परमेश्वराची कृपा चिरंतन आहे!’ मी यहूदासाठी चांगल्या गोष्टी करीन. म्हणून लोक असे म्हणतील. ते सर्व सुरुवातीला जसे होते तसे असेल.” देवाने ह्या गोष्टी सांगितल्या.

प्रेषितांचीं कृत्यें 2:13

दुसरे लोक प्रेषितांना हसत होते. त्यांना असे वाटले की, प्रेषित द्राक्षारस खूप प्रमाणात प्यालेले आहेत.

1 करिंथकरांस 2:14

स्वाभाविक मनुष्य देवाच्या आत्म्याने प्रगट झालेल्या गोष्टी ग्रहण करीत नाही. कारण त्या त्याला मूर्खपणाच्या आहेत. आणि त्या त्याला समजत नाहीत, कारण त्यांची आध्यात्मिक रितीने पारख केली जाते.

2 करिंथकरांस 5:13

जरी आम्ही वेडे असलो तरी ते ख्रिस्तासाठी, जर आम्ही आमच्या योग्य मन:स्थितीत असलो तर ते तुमच्यासाठी.

इब्री लोकांस 9:4

त्यामध्ये ऊद जाळण्यासाठी सोन्याची वेदी होती. आणि कराराची पेटी (कोष).ही पेटी (कोष) संपूर्ण सोन्याने मढवलेली होती त्या पेटीत (कोषात) एका सोन्याच्या भांड्यात मान्रा होता, तसेच अहरोनाची काठी जिला पाने फुटलेली होती व कराराच्या दगडी पाट्या होत्या.

Interlinear

Choose Theme