Home Bibles 1 इतिहास 12:3 · मराठी बायबल
1 इतिहास 12:3 · मराठी बायबल

अहीएजर हा त्याच्यांतला प्रमुख. मग योवाश (गिबा येथील शमा याचे हे मुलगे) त्यानंतर यजिएल आणि पलेट. हे अजमावेथ याचे मुलगे. अनाथोच येथील बराका व येहू.

Cross references

1 शमुवेल 11:4

शौल राहात होता तेथे म्हणजे गिबा येथे याबेशचे दूत येऊन पोचले. त्यांनी लोकांना हे सर्व सांगितले. तेव्हा लोकांनी रडून आकांत मांडला.

2 शमुवेल 21:6

तेव्हा शौलची सात मुले आमच्या हवाली कर. शौलला परमेश्वराने राजा म्हणून निवडले होते. तेव्हा शौलाच्या गिबा डोंगरावर त्याच्या मुलांना आम्ही देवासमक्षच फाशी देऊ.”राजा दावीद म्हणाला, “मला हे मान्य आहे. त्यांना मी तुमच्या हवाली करतो.”

2 शमुवेल 23:31

अबी-अलबोन अर्वाथी, अजमावेथ बरहूमी,

1 इतिहास 11:28

तकोइच्या इक्केशचा मुलगा ईरा, अनाथोथचा अबियेजेर

1 इतिहास 11:33

अजमावेथ बहरुमी, अलीहबा शालबोनी,

Interlinear

Choose Theme