Home Bibles 1 इतिहास 10:6 · मराठी बायबल
1 इतिहास 10:6 · मराठी बायबल

अशाप्रकारे शौल आणि त्याचे तीन मुलगे यांना मरण आले. शौलाच्या कुटुंबाला एकदमच मृत्यू आला.

Cross references

1 शमुवेल 4:10

तेव्हा पलिष्ट्यांनी पराक्रमाची शर्थ करुन इस्राएल लोकांचा पाडाव केला. सर्व इस्राएली सैनिकांनी घाबरुन आपल्या छावणीकडे पळ काढला. त्यांचा तो दारुन पराभव होता. तीस हजार इस्राएली सैनिक मारले गेले.

1 शमुवेल 4:18

करारकोशाचे वृत्त समजताच वेशीजवळ आसनावर बसलेला एली तिथेच मागच्यामागे पडला आणि त्याची मान मोडली. तो वृध्द आणि स्थूल झाला होता. तात्काळ त्याचा प्राण गेला. वीस वर्षे तो इस्राएलचा शास्ता होता.

1 शमुवेल 12:25

पण तुम्ही आडमुठेपणा आणि दुष्टपणा दाखवलात तर मात्र केरसुणीने केर झटकावा तसा, तुम्हाला तुमच्या राजासह परमेश्वर नष्ट करुन टाकील.”

उपदेशक 9:1

मी या सगळ्या गोष्टींचा काळजीपूर्वक विचार केला. चांगल्या आणि शहाण्या माणासांचे काय होते आणि त्यांनी काय करावे हे सर्व देवाच्या हातात असते. आपला तिरस्कार केला जाईल की आपल्यावर प्रेम केले जाईल याबद्दल लोकांना काहीही माहीत नसते. आणि भविष्यात काय होणार या बद्दल ही त्यांना काही माहीत नसते.

होशेय 13:10

तुझा राजा कोठे आहे? तुझ्या सर्व नगरांत तो तुला वाचवू शकत नाही. तुझे न्यायाधीश कोठे आहेत? ‘मला राजा व नेते दे’ अशी विनवणी तू केली होतीस.

Interlinear

Choose Theme